अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला आहे – संजय राऊत

0
165

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला आहेत. त्यांनी शरद पवारांना या वयात दगा दिला आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यात कुठेही नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवारांची जागा ऑर्थर रोडमध्ये असेल अशी त्यांना धमकी देऊन त्यांना फोडलं, असंही राऊत म्हणाले आहेत.

ज्यांनी या वयात शरद पवार या नेत्याला दगा देण्याचा प्रयत्न केला ही सुद्धा महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे. राज्याची जनता हे पाप ठोकरुन लावल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या जनतेला आंधारात ठेवून ही शपथ घेतली आहे याचा अर्थ तुम्ही पाप केलंय. रात्रीच्या अंधारात पाप होतं. चोरुन डाका घातला जातो, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here