मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशनापासून म्हणजेच विरोधकांच्या आणि जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. जे अधिवेशनात मांडायचे आहेत. त्यासाठी आम्ही पूर्ण अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. पण सरकार कायद्यात न बसणारं अधिवेशन घेत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे
कोरोनामुळे पूर्ण अधिवेशन घेता येत नसेल तर आता लेखानुदान घ्या आणि नंतर पूर्ण अधिवेशन घ्या, अशीही मागणी भाजपने केली आहे. पण कोरोनाच्या नावाखाली सरकार अधिवेशनासाठी तयार नाही. इथं कोरोना म्हणता आणि बाहेर तुमच्या मंत्र्यांचे सगळे कार्यक्रम सुरु आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, तुमच्या मंत्र्यांना कुठलेच नियम नाहीत का? नियम फक्त विरोधी पक्षासाठी आहेत का? असा सवालही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. हा प्रकार म्हणजे पूर्णपणे अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचं नाटक सुरु आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
तृप्ती देसाईंच संजय राठोड यांना खुलं पत्र; म्हणाल्या…
धनंजय मुंडेंनी बलात्कार आरोपाचं प्रकरण काय देऊन सेटल केलं, हे त्यांनाच ठाऊक- निलेश राणे
“मीही शरद पवारांच्या तालमीत तयार, ते संजय राठोडांना पाठीशी घालणार नाहीत”
“जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत”