15 दिवसात मोठे भूकंप, विश्वास बसणार नाही असे नेते भाजपमध्ये येणार; भाजप नेत्याचा दावा

0
136

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशातच आता भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.

फक्त 15 दिवस थांबा राज्यात आणखी प्रचंड मोठे भूकंप होणार आहेत. तुम्हाला वाटणारही नाही, असे नेते भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला धक्का; मिलिंद देवरा करणार शिवसेनेत प्रवेश

तुम्हाला बोललो होतो की, राजकारणात मोठे मोठे भूकंप होतील. त्याप्रमाणे आज काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. पुढे अजूनही मोठे भूकंप होतील, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान, आज मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. पुढच्या 15 दिवसात आपल्याला अपेक्षित नाही अशी लोक भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील, असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

बाळासाहेब असते तर…; एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहिमेवरून राऊतांची टीका, म्हणाले…

राजकारणात मोठी खळबळ ; ‘या’ महिला नेत्याचा धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here