मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे. या प्रकरणावर 15 दिवस मौन धरल्यानंतर राठोड यांनी काल पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन करत बदनामी केली जात असल्याचा दावा केला. मात्र, राज्यात करोनाचं संकट असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
करोना काळात गर्दी केली म्हणून 10 हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही. एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे… तो मी नव्हेच,” अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.
◆कोरोना काळात गर्दी केली म्हणून 10 हजार जणांवर गुन्हे दाखल करु पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही❓
◆ एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मा.मुख्यमंत्री बोलणार नाहीत❓
महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे…
तो मी नव्हेच,‼️— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राज्यातील कोणताही सरपंच हा मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त हुशार- नारायण राणे
संजय राठोड याला चपलेनं झोडला पाहिजे- चित्रा वाघ
बलात्कार करणाऱ्या लोकांना हे सरकार पाठीशी घालतंय- नारायण राणे
कुलू, मनालीला जायाचं?; पूजा चव्हाण-गबरुशेठ मधील नवीन ऑडिओ क्लिप समोर आल्यानं खळबळ