“पंतप्रधान नरेंद्र मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”

0
152

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड :  देशात पुन्हा भाजपाची सत्ता येईल आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनतील, असा दावा भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी केवळ दोन वर्षे पंतप्रधान म्हणून काम करतील, त्यानंतर ते हिमालयात निघून जातील, असंही बोललं जात आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

ही बातमी पण वाचा : टोलच्या मुद्द्यावरुन मनसेनंतर काँग्रेसही आक्रमक: केली ‘ही’ महत्वाची मागणी

नरेंद्र मोदींना दोन वर्षांनी हिमालयात कशाला पाठवताय, त्यांना आताच हिमालयात पाठवा. देशाचं खूप भलं होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

आगामी काळात नरेंद्र मोदी विरोधी पक्षांना ‘बापात बाप आणि लेकात लेक’ ठेवणार नाहीत, अशी अवस्था करतील,असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते बीड येथील सभेत बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी – 

भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून हा तर…; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडी, इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार – प्रकाश आंबेडकर

अंधारे बाई, याद राखा, यापुढे राजसाहेबांच्या नातवाला काय बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here