Home महाराष्ट्र “धोका वाढला! साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी”

“धोका वाढला! साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी”

सातारा : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे साताऱ्यातही कोरोनाचा पुढील धोका विचारात घेऊन जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे.

सध्या लग्नसराई आणि शाळांमध्ये सोशल डिस्टन्स पाळला जात आहे का? यासाठी पोलिसांची फिरती गस्त पथके तैनात करण्यात आली आहेत. यापुढील काळात राजकीय कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले असून, यामध्ये सोशल डिस्टन्स तसेच 50 व्यक्तींची मर्यादा करण्यात आलीय. 1 मार्चपर्यंत यात परिस्थितीनुसार बदल केले जाणार असल्याचं साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, या संचारबंदीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना वगळण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजारानं निधन”

“जो पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही”

आमच्या जिल्हयात ‘सामना’ येतचं नाही, त्यामुळे…; गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेला टोला

…अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू- सतेज पाटील