सिंधुदुर्ग : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा, त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील आणि श्रीरामही खूश होतील, असा टोला सामनातून केंद्र सरकारला लगावला होता. यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोपीचंद पडळकर सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सामना वृत्तपत्रातून केंद्र सरकारवर करण्यात आलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता, सामनात काय लिहिलं जातं याची फार दखल घेण्याची गरज नाही, असं म्हणत पडळकरांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
सामना वृत्तपत्र कोणीही वाचत नाही, सामनामध्ये काय लिहून आलं आहे. हे तुम्ही टीव्हीवर दाखवता मगं ते लोकांना कळत, कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मगं कोकणात सामनाच्या किती प्रती येतात?, असा प्रश्न पडळकरांनी शिवसेनेला केला.
दरम्यान, आमच्या जिल्हयात सामना येतचं नाही, त्यामुळे या विषयावर बोलण्याची मला फारशी गरज वाटत नाही असं म्हणत पडळकरांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला.
महत्वाच्या घडामोडी –
…अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू- सतेज पाटील
“काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्की लागला आहे”
“मध्यप्रदेश हादरलं! भाजपच्या पदाधिकाऱ्यासह चाैघांनी 20 वर्षाच्या तरूणीवर केला बलात्कार”
माझं महाराष्ट्रातील जनतेला कळकळीचं आवाहन की…; राजेश टोपे यांच रुग्णालयातून पत्र