मुंबई : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लोकांची होणारी गर्दी पाहता केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणली. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
10 ते 5 ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय? मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री.. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी…मग दुसऱ्यांना सल्ला द्या, असं अतुल भातखळकर म्हणाले.
दरम्यान, 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावं, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.
१० ते ५ ही मानसिकता बदलण्याचा सल्ला शासकीय कर्मचाऱ्यांना कोण देतंय?
मंत्रालयात न जाता घरी बसून राज्याचा कारभार हाकणारे (????)मुख्यमंत्री. अहो आधी तुमची मानसिकता बदलायला हवी… मग दुसऱ्यांना सल्ला द्या. pic.twitter.com/NRlYBwDbyV— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…अन्यथा कोरोना पुन्हा येईल; भगतसिंह कोश्यारी यांचा इशारा
“उद्धवजींचे सरकार ना रामाचं…ना भिमाचं…नाही काही कामाचं”
दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर…- करुणा शर्मा
“तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, जब जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ”