पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणी अल्पसंख्याक नेते नवाब मलिक यांनी चंद्रकातं पाटलांवर निशाणा साधालाय.
कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले; तेव्हा अटलजी सत्तेत होते. कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्या काळात अटलजी मोदींना राजधर्म काय?, याचा धडा शिकवत होते, असं नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, त्यातील एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”
…ते फक्त नावालाच शिवजयंती साजरी करणार; निलेश राणेंची टीका
नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं; चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा
हे सरकार दारुडं सरकार आहे; सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल