सांगली : शिवजयंतीला घातलेल्या निर्बंधावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हे सरकार दारुडं सरकार आहे. कोरोना काळात या सरकारने दारूतून जास्त कर मिळतोय म्हणून दारूची दुकाने सुरू केली आणि मंदिरे बंद ठेवली, असं म्हणत खोत यांनी सरकारला टोला लगावला आहे.
दरम्यान, कोरोना वाढला आहे असं सरकार सांगत आहे. मात्र 6 महिने कोरोना कुठे झोपला होता का? 6 महिने तुम्ही चाचण्याच घेतल्या नाहीत का? आता अधिवेशन जवळ आले आहे. त्यात विरोधी आमदार जनतेचे प्रश्न मांडणार, आपल्याला तोंड द्यावं लागणार म्हणून राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे का? असे अनेक प्रश्न खोतांनी यावेळी उपस्थित केले.
महत्वाच्या घडामोडी –
आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…; सदाभाऊ खोतांचं अमोल मिटकरींना प्रत्युत्तर
“निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात”
पेट्रोलचे भाव ठाकरे सरकारमुळे वाढले, कर कमी केल्यास पेट्रोल 75 रुपयांना होईल- किरीट सोमय्या
खासदार उदयनराजे भोसले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या भेटीला! चर्चांना उधाण