सिंधुदुर्ग : राज्य सरकारने सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यास मनाई केली आहे. मात्र हे आदेश झुगारून भाजप नेते निलेश राणेंनी शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली. यावर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी खासदार निलेश राणे हे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करतात. सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्याच्या डागडुजीसाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहे. या किल्ल्यातील पाणी योजनेसाठी राज्य सरकाराने 5 कोटी निधी दिला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे, असंही वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वैभव नाईक यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराला भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
पेट्रोलचे भाव ठाकरे सरकारमुळे वाढले, कर कमी केल्यास पेट्रोल 75 रुपयांना होईल- किरीट सोमय्या
खासदार उदयनराजे भोसले गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या भेटीला! चर्चांना उधाण
दादांच्या मनात काय चाललंय हे कळलं पाहिजे म्हणून ‘ती’ भाषा शिकणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा, जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”