सातारा : एकीकडे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असताना आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली.
उदयनराजे भोसले हे शंभूराज देसाई यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खलबते रंगली. तसेच उदनयराजे आणि शंभूराज देसाई यांची ही काही पहिलीच भेट नाही. यापूर्वी अनेकवेळा दोन्ही नेते एकमेकांना भेटले आहेत.
दरम्यान, 8 मार्चपासून मराठा आरक्षण सुनावणी आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणीही राजकारण करु नये. त्यादरम्यान अधिवेशन होत असल्यामुळे या विषयी चर्चा झाली. सातारा शहरात लष्कर प्रशिक्षण केंद्र आणण्याबाबत शंभुराज देसाईंसोबत चर्चा झाली., असं उदयनराजे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
दादांच्या मनात काय चाललंय हे कळलं पाहिजे म्हणून ‘ती’ भाषा शिकणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा, जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”
छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज संपूर्ण जगात पसरवू- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं, महाराष्ट्रातही तसंच होईल”