पुणे : शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केलं.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा आहे. शिवरायांची कीर्ती आणि तेज जगभरात पोहोचवण्याचं काम सरकार करेल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
सगळं ठिक आहे, फक्त तोंडावर मास्क आहे. या भूमीत, या मातीत हे तेज जन्माला आलं, त्याच मातीतील आपण लेकरं आहोत. छत्रपतींनी ज्या लढाया केल्या. जो स्वराज्यावर चालून आला, त्याची विल्हेवाट कशी लावली हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. आता तसं युद्ध नसलं तरी करोनाबरोबर आपलं युद्ध सुरू आहे. या युद्धात मास्क ही ढाल आहे., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, कोरोनाशी लढतांना छत्रपतींकडून प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. राजकारण बाजुला पण, आमच्या सगळ्यांच्या मनात शिवप्रेम आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज संपूर्ण जगात पसरवू, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“विरोधकांचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं, महाराष्ट्रातही तसंच होईल”
“शशिकांत शिंदे आणि मी एकच; शिवेंद्रराजेंची होणार राष्ट्रवादीत घरवापसी?”
महाराज आज असते तर त्यांनीही लोकांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता- अजित पवार
“आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण”