पुणे : महाराज आज असते तर त्यांनीही लोकांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता. महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जनतेचं हित आणि कल्याण लक्षात ठेवूनच घेण्यात आला होता, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.
शिवनेरी किल्ल्यावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा साजरा केला जात आहे. यावेळी अजित पवार बोलत होते.
कोरोना संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहत आहे. गेल्यावेळी असं कोणतंही संकट नव्हतं. शिवजयंती उत्साहात साजरी करायची असते याबाबत कोणाचंही दुमत नाही. पण सध्या कोरोना संकट आणि खासकरुन विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोलामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री, गृहमंत्री मागच्या काळात करोनाच्या वेळी घराघरात फिरलेले आपण पाहिले, पण यावेळी त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे., असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे तसंच आपल्यासोबत इतरांचीही काळजी घ्यावी हेच सांगायचं तात्पर्य आहे, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
“आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण”
“अर्जुन तेंडुलकर खेळणार ‘मुंबई इंडियन्स’ संघाकडून”
के. गाैतमवर लागली तब्बल ‘इतक्या’ कोटींची बोली; CSK ने घेतलं आपल्या संघात
सत्ता तुमची असली तरी…; अतुल भातखळकरांची नाना पटोले यांच्यावर टी