गोवा : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन झालं आहे. गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 73 वर्षांचे होते.
3 वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या कॅप्टन सतीश शर्मा यांनी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. त्यांना कॅन्सर झाला होता, तसेच ते आजारीदेखील होते.
दरम्यान, कॅप्टन सतीश शर्मा राजीव गांधींचे निकटवर्तीय होते. पी.व्ही.नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये कॅप्टन सतीश शर्मा यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय देण्यात आलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप खासदार रक्षा खडसे कोरोना पाॅझिटिव्ह”
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना कोरोनाची लागण”
महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि…; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
…सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची अवस्था होईल; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल