पुणे : मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. कालांतराने हे प्रकरण शांत होत असतानाच आता पीडीत तरूणीने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी शेख यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुलीने काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार असतील, असंही देसाई यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, मला न्याय मिळाला नाही तर 5 दिवसांच्या आत आत्महत्या करणार असल्याचा इशारा पीडित तरुणीने दिला आहे. इतकच नाही तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असं पीडित तरुणीने म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा- उद्धव ठाकरे
“…तर भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल”
“…तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील”
खासदार नवनीत राणा यांना धमकीचं पत्र; धमकी शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर