मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमींच्या कारचा शनिवारी अपघात झाला. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी बॉलिवूडसह फॅन्सनी प्रार्थना केली आहे. यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाही आहे. तिने आपल्या अकाऊंटवर ट्विट केलं. त्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
उर्वशी म्हणाली, शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात अस्वस्थ करणार आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते’ हे ट्विट तिने इंग्रजीमधून केलं होतं.
The news of @AzmiShabana Ji’s injury in an accident is distressing. I pray for her quick recovery.
— URVASHI RAUTELA (@UrvashiRautela) January 18, 2020
‘शबाना आझमी यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना करतो,’ असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मोदींनी केलेलं हे ट्वीट उर्वशीने कॉपी केलं आहे. असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे.
दरम्यान, Ctrl C Ctrl V म्हणजेच कॉपी पेस्ट आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. Ctrl C Ctrl V याचा अर्थ कॉपी-पेस्ट करणं असा होतो.
महत्वाच्या घडामोडी-
2014 मध्येही शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला होता- पृथ्वीराज चव्हाण
गेली सात वर्षे मी सर्व सहन केलं; धनंजय मुंडे झाले भावूक
“नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बना”
‘तान्हाजी द अनसंय वॉरियर’ चित्रपटात दाखवलेला इतिहास चुकीचा- सैफ अली खान