जळगाव : जळगावमध्ये ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत.
रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गावांमधून काही मजूर पपई ट्रकमध्ये भरण्याच्या कामासाठी गेलेले होते. ट्रकमध्ये पपई भरल्यानंतर ते रात्री पुन्हा रावेरला परत येत होते. किनगावजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.
अपघातात काही मजूर ट्रकखाली तर काही मजूर पपईखाली दबले गेले. यामध्ये 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने लवकर मदतकार्य मिळू शकले नाही. त्यामुळे अनेक जखमींचा मृत्यू झाला. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये सर्वाधिक पुरुष मजुरांचा समावेश आहे. 7 पुरुष तर 6 महिलांचा आणि 2 बालकांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, ट्रकमध्ये एकूण 21 मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या घडामोडी
“आजपासून टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार”
रोहिणीताई, राष्ट्रवादीनं तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू- जयंत पाटील
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या- चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळ वळण, पूजाच्या वडिलांनी सांगितलं आत्महत्येचे कारण; म्हणाले…