“मोठी बातमी! अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल”

0
372

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उकरून काढल्यानंतर, राज्यातल्या राजकारणातील वातावरन तापलं आहे. अशातच या वादात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी मारली होती.

कसल्याही परिस्थितीत आपण मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी म्हटलं आहे. यानंतर राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार फिल्डिंग लावली. तर पोलिसांनी राणा दांपत्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी अटक केली. त्यानंतर त्यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्यापूर्वी नवनीत राणांच्या प्रकृतीत बिघाड झाली असल्याची माहिती समोर आली असून त्यांना उपचारासाठी जे.जे.रूग्णालयात हलविण्यात आलं आहे.

हे ही वाचा : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनी…; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका

दरम्यान, नवनीत राणा यांना मणक्याचा त्रास असून न्यायालयीन कोठडीत त्यांना जमिनीवर बसावं आणि झोपावं लागत असल्याने त्यांचा हा त्रास वाढला. त्यामळे त्यांनी सिटी स्कॅन करण्याची परवानगी तुरुंग अधिकाऱ्यांना मागितली होती. मात्र अधिकाऱ्यांकडून त्यांना ही परवानगी मिळाली नाही. मात्र राणा यांच्या वकिलांनी जर नवनीत राणा यांना काही झालं तर तुम्ही त्याला जबाबदार तुम्हा असाल, असं वकिली पत्रात म्हटलं. त्यानुसार नवनीत राणांना उपचारासाठी जे.जे.रूग्णालयात हलविण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ज्या दिवशी माझं सरकार येईल त्यावेळी मी…; राज ठाकरेंनी शेअर केला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ”

 …आणि मविआ सरकार राज ठाकरेंना तुरूंगात डांबेल- चंद्रकांत पाटील

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here