मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिली नसल्याचं समोर आलं आहे. यावरून विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका झाली. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेतच . पण ते ज्या पदावर सध्या विराजमान आहेत त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांचीही तितकीच आहे . राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे व त्यात राज्यपालांचेच अधःपतन सुरू आहे, असं म्हणत सामना अग्रलेखातून राज्यपालांना टोला लगावला आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांच्या तोंडात अहंकाराची भाषा शोभत नाही. सध्या अहंकाराचे राजकारण कोण करीत आहे ते संपूर्ण देश जाणतोय. दिल्लीच्या सीमेवर दोनशे शेतकऱ्यांनी प्राणार्पण करूनही सरकार पृषी कायद्यांबाबत मागे हटायला तयार नाही. त्यास अहंकार नाही म्हणायचे तर काय? असा प्रश्न देखील यावेळी सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी
‘ही’ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे- चंद्रकांत पाटील
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन तृप्ती देसाई आक्रमक; ठाकरे सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अजित पवारांच मोठं वक्तव्य; म्हणाले…
साताऱ्यात कॉलेज तरुणींची तुफान हाणामारी; व्हिडीओ होतोय व्हायरल