मुंबई : पुण्यात शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणीने रविवारी पुण्यातील महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकारमधील विदर्भातील एका मंत्र्याचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनीही या प्रकरणावरून थेट राज्य सरकारवर आरोप केला आहे.
पूजा चव्हाणची सुरुवातीला आत्महत्या आहे असं समोर आलं होतं मात्र जे काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाले आहेत तर काही पुरावे समोर आले आहेत. जेव्हा असे पुरावे बाहेर येतात तेव्हा सुमोटो अॅक्शन घेणं गरजेचं आहे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करत तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मागच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर अशा प्रकारचे आरोप झाले होते आणि आता या सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप होत आहे. राजकीय दबावापायी ही प्रकरणं दाबल्याचा प्रयत्न होत आहे. हे अजिबात होता कामा नये, असही तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अजित पवारांच मोठं वक्तव्य; म्हणाले…
साताऱ्यात कॉलेज तरुणींची तुफान हाणामारी; व्हिडीओ होतोय व्हायरल
मुख्यमंत्री महोदय, एवढे पुरावे असतांना वाट कसली पाहताय?; चित्रा वाघ यांचा सवाल
…यापुढे काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार; नाना पटोलेंचं मोठं विधान