मुंबई : काँग्रेस महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच यापुढं काँग्रेसच महाराष्ट्रात सत्तेत राहणार, असं वक्तव्य काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रॅली काढली. मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान नाना पटोले यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
दरम्यान, मुंबईत महात्मा गांधींनी परकीयांना बाहेर काढण्याचा जो विचार मांडला तोच विचार आम्ही मांडत आहोत. देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात ‘चले जाव’ ची घोषणा आम्ही देणार आहोत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
प्रदेश प्रभारी श्री एच. के. पाटील जी. व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात व अन्य नेतागण व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष पदाचे मुंबई येथील टिळक भवन कार्यालयात पदभार स्वीकारला. pic.twitter.com/gjZiV57ZIN
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 12, 2021
महत्वाच्या घडामोडी
16 फेब्रुवारीपासून पेंग्विन पहायला याचचं हं! पण खबरदार जर…; आशिष शेलारांचा सरकारवर हल्लाबोल
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; अँडरसनसह 4 खेळाडू संघाबाहेर
“राज्यपालांसारखाच मंत्रिमंडळालाही मान, एका हाताने टाळी वाजत नाही”
मनसे-भाजप युतीवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…