Home पुणे मनसे-भाजप युतीवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मनसे-भाजप युतीवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

पुणे : सध्या राजकीय वर्तुळात मनसे-भाजप युतीच्या चर्चा जोरदार रंगत आहे. मात्र आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पुण्यातील आढावा बैठकीत ते बोलत होते.

आढावा बैठकीत फडणवीसांनी पुणे महापालिकेच्या निवडक कामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर अभय योजना, पीपीपी तत्वावरील प्रकल्प आणि 6 मीटर लांबीच्या रस्त्यांचे रूंदीकरण या महत्त्वाच्या निर्णयांचे स्वागत केलं आहे. तर केलेल्या कामांबद्दल पदाधिकाऱ्यांचे देखील कौतुक केले आहे.

दरम्यान, अशा योजना भाजप सत्तेतील महापालिकेत राबवणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी 

“राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सगळे विरोधक एकसूरात टिका करतायेत, पण…”

“कर्जत तालुक्यामध्ये रोहित पवारांचं वर्चस्व, तब्बल 47 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात”

शरद पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण ही अपमानास्पद बाब- गोपीचंद पडळकर

हिंगणघाटमधील निवासी शाळेमध्ये तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण