पुणे : पुण्यात शिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणीने रविवारी पुण्यातील महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती, त्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकारमधील विदर्भातील एका मंत्र्याचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या आत्महत्या प्रकरणातील मंत्र्याला महाविकास आघाडी सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा मंत्री शिवसेनेचा असल्याची चर्चा आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील सत्य बाहेर आणले पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी
“शर्जिल व एल्गार परिषदेसाठी ठाकरे सरकारकडून पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध”
“ठाकरे सरकार अशा द्वेषपूर्ण उटपटांग निर्णयासाठी कायम लक्षात राहील”
उदयनराजे भोसलेंनी सांगितलं शरद पवारांना भेटण्यामागचं कारण; म्हणाले…
“शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर”