नवी दिल्ली : पुढील आठवड्यात 2 दिवस बॅंक कर्मचाऱ्यांनी संप पुकरला आहे. यामुळे पुढील सलग 3 दिवस बॅंका बंद राहणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्याचे तसेच बँकांचे खाजगीकरण करण्याचे संकेत केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना दिले होते. या खाजगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी 2 दिवस संप पुकारला आहे. पुढील आठवड्यात 15 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारी या 2 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यात 14 फेब्रुवारीला रविवार आला असल्याने या दिवशी बँकेला अधिकृत सुट्टी असते.
दरम्यान, आज United Forum Of Bank Unions (UFBU) च्या झालेल्या मिटींगमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या मिटींगनुसार बँकांच खाजगीकरण होत असल्याच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
महत्वाच्या घडामोडी
मी या पृथ्वीतलावरची सर्वात चांगली अभिनेत्री- कंगणा रणाैत
निवडणुकीत पवार साहेबांनी कुस्ती काय असते हे दाखवून दिलं; राष्ट्रवादीचं सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर
भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय- आशिष शेलार
“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात”