Home महाराष्ट्र हे सरकार बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं सरकार- चित्रा वाघ

हे सरकार बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं सरकार- चित्रा वाघ

यवतमाळ : यवतमाळ येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आलं. त्यावरुन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली. यवतमाळमध्ये भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

राज्यातील सरकार हे बालकांचं हत्यारं आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारं सरकार आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

“भंडारा जिल्हा रुग्णालयात 11 बालकांचा होरपळून मृत्यू होऊन एक महिना लोटला होता. त्यानंतर यवतमाळमध्ये बालकांना सॅनिटायझर पाजल्याचे प्रकरण समोर आलं होतं. मात्र या दोन्ही घटनेतील जबाबदारांवर अद्याप गुन्हे दाखल झालेले नाही. अशाप्रकारे निष्काळजीपणा करणाऱ्यांना सरकार अभय तर देत नाही ना?” असा सवाल चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, यवतमाळ येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त केला होता. नुकतंच चित्रा वाघ यांनी यवतमाळमधील कापसी कोपरी गावात जाऊन त्या बालकांसह मात्यापित्यांची चौकशी केली. त्यानंतर चित्रा वाघ जिल्हा पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली.

महत्वाच्या घडामोडी

वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी; आशिष शेलारांची ठाकरे सरकरवर टीका

फासा आम्हीच पलटणार म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना रोहित पवारांच प्रत्युत्तर; म्हणाले…

“नारायण राणे 22 वर्षे ‘पुन्हा येईन’ची वाट बघतायत, फडणवीस 25 वर्षे बघतील”

“GST विरोधात 26 फेब्रुवारीला व्यापाऱ्यांकडून ‘भारत बंद’ची हाक”