अकोला : मुठभर भांडवलदारांचा विचार भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून ते शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशाची अर्थव्यवस्था भाजपने कमकुवत केली आहे म्हणून यांना इंधनावर कर आकारावे लागत आहेत. त्यामुळे इंधनाचे दर वाढवले जात आहेत. अशा लोकांचा सामना करायचा आहे म्हणून आपलं संघटन मजबूत करा, असं जयंत पाटलांनी आवाहन केलं.
मला विश्वास आहे की, पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस चांगली कामगिरी करेल. आपल्याला महाराष्ट्रात पक्ष वाढवायचा आहे. सोबत काँग्रेस आणि सेना आहेच, महाविकास आघाडीच्या कोणत्या नियमांना धक्का न लावता राष्ट्रवादी काँग्रेस कशी मोठी हाईल याचा आम्ही प्रयत्न करू, असा विश्वास जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेत जयंत पाटील यांनी अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी
राज्याच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने- अजित पवार
राज्यात ऑपरेशन लोट्स झाल्यास भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही- नाना पटोले
घमंड जादा हो तो हस्तियाँ डूब जाती है; संजय राऊतांचं अमित शहांना त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर
“शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी केवळ…; राहुल गांधींचा हल्लाबोल