पुणे : शेतकरी आंदोलनावर मास्टर ब्लास्टर व भारतरत्न सचिन तेंडुलकरने भाष्य केलं होतं. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असं सचिननं म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
सचिन तेंडुलकरच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील, असं शरद पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. सहानुभूती मिळते. हे खरं तर चांगलं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आपले पंतप्रधान तिकडे बोलले होते. आता त्यांची प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत, असंही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार असताना औरंगाबादचं संभाजीनगर का झालं नाही?- राज ठाकरे
अर्जुन तेंडुलकर IPL मध्ये खेळणार; ‘या’ संघाकडून प्रतिनिधीत्व करण्याची शक्यता
अमित शहांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावं- नारायण राणे
“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात”