पुणे : अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत निलेश राणेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं, असं म्हणत अजित पवारांनी निलेश राणेंना टोला लगावला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, 2 उपमुख्यमंत्रीपद असण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना समसमान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे फॉर्म्युला आधीच ठरलेला आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“सचिन तेंडुलकर हा भाजप सरकारचा दलाल”
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजपची – शरद पवार
आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे