मुंबई : मुंबई महापालिकेचा 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 39,03,83 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला. या अर्थसंकल्पावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
बुलेट ट्रेनला विरोध…मेट्रो कारशेडचा खेळखंडोबा…कारभारी नव्या प्रत्येक प्रकल्पांना विरोध करणार..आणि पालिका म्हणते, आम्ही मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा देणार..चौकांचे आणि उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण म्हणजे जागतीक दर्जाच्या सुविधा असतात काय? कमी व्याजावर 77 हजार कोटींच्या ठेवी बँकेत ठेवून बँकाना पैसा वापरायला देणारी महापालिका…दुसरीकडे कर्ज काढून चढ्या दराने व्याज भरणार..एकीकडे महसूलात घट, कर्ज घेणार सांगणारी महापालिका म्हणतेय अर्थसंकल्पाचे आकारमान 16.74 टक्के वाढणार..फसलेला ताळमेल अन् सगळा आकड्यांचा खेळ!, असं आशिष शेलार म्हणाले.
समुद्राचे पाणी गोडे करणे, वरळी डेरीवर जागतिक पर्यटन केंद्र उभारणे, हे सारे पाहिले की हा पालिकेचा अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला आहे.
करात वाढ नसली तरी शुल्क आकार सुधारणा प्राधिकरण घोषित करून शुल्क वाढीच्या नावाने खिसा कापण्याचे सूतोवाच आहेच.
◆ समुद्राचे पाणी गोडे करणे ◆वरळी डेरीवर जागतिक पर्यटन केंद्र उभारणे..
हे सारे पाहिले की
हा पालिकेचा अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?
3/4— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 3, 2021
महत्वाच्या घडामोडी-
करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…
धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?; तृप्ती देसाईंचा सवाल
“मला कोणी खलनायक ठरविलं तरी चालेल पण मी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणार नाही”
पक्ष वाढवायचा असेल तर…; जयंत पाटलांच कार्यकर्त्यांना आवाहन