मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या वर रेणू शर्मानंतर आता करुणा शर्माने नवे आरोप केले. यानंतर धनंजय मुंडेच्या अडचणी वाढताना दिसत होत्या, अशातच त्यांच्या मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाल्याचं मानलं जातंय.
आपल्याला आपल्या मुलांना भेटू दिलं जात नाही, मुलांना डांबून ठेवण्यात आलं आहे, असे आरोप करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केले आहेत. या आरोपानंतर धनंजय आणि करुणा यांच्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तीने स्वतःच्या यूट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ टाकला आहे. ज्यामध्ये ती आपल्या मैत्रिणीसोबत आनंदात असल्याचं दिसत आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. याउलट व्हिडीओत मुलगी आनंदात असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु असल्याचं करुणा यांनी म्हटलं असलं तरी मुलीचा हा व्हिडीओ आठवडाभरापूर्वीचा असल्याचं दिसतंय. त्यामुळे करुणांच्या आरोपात किती तथ्य आहे यावर शंका उपस्थित केली जातेय.
महत्वाच्या घडामोडी-
अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?; आशिष शेलारांची टीका
करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…
धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?; तृप्ती देसाईंचा सवाल
“मला कोणी खलनायक ठरविलं तरी चालेल पण मी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणार नाही”