वर्धा : “पक्ष वाढवायचा असेल तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल. त्यासाठी आपल्या बुथ कमिट्या पूर्ण करा,” असम महत्त्वपूर्ण आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. वर्ध्यातील राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यावेळी ते बोलत होते.
वर्धा मतदारसंघात तरुणांची फळी सक्षम करायला हवी. त्यामुळे नक्कीच पक्षाला मोठी मदत होईल. पक्ष चालवत असताना प्रदेश, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यात समन्वय पाहिजे,” असं जयंत पाटील म्हणाले.
देशात दिग्गजांचा पराभव झाला आहे. स्वर्गीय इंदिरा गांधीही त्यात अपवाद नाही. झालेला पराभव मागे टाका आणि कामाला लागा. आपले मनोधैर्य वाढण्यासाठीच राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आपल्या भागात आली आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मांची मुंबई पोलीस आयुक्तांकडेतक्रार
“…तर मग फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”
शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय?; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल
येत्या 15 फेब्रवारीपासून महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत