मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे, अशी टीका अजित पवारांनी यावेळी केली. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा या अर्थसंकल्पात कायम आहे. तसेच महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव काहीही दिसत नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अर्थसंकल्पात यावेळीही अन्याय झाला आहे. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही अजित पवारांनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी-
…तर बंगळुरवर देखील आमचा अधिकार; जयंत पाटलांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही- चंद्रकांत पाटील
“PF संदर्भात निर्मला सीतारमण यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा”
‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन