मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.
युती ही समविचारी घटकांची होत असतो. वैचारिक विचारधारावर होत असते किंवा तशाप्रकारचे वातावरण असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली किंवा तशाप्रकारचे काही वातावरण आले तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगलं वातावरण निर्माण होईल असं मला वाटतं, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी यावेळी दिली.
महत्वाच्या घडामोडी-
अखेर अण्णा हजारेंचा हट्ट मागे! देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं
“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे”
लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की…; राम कदमांची टीका
रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा- सचिन सावांत