अहमदनगर : शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करणार आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी आपला उपोषणाचा निर्णय मागे घेतला. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
ज्येष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारेजी यांची आज राळेगणसिद्धी येथे केंद्रीय मंत्री श्री कैलाश चौधरीजी यांच्यासमवेत भेट घेतली. केंद्र सरकारच्या विनंतीचा मान राखत त्यांनी आपले उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे., असं देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलं आहे.
ज्येष्ठ समाजसेवक मा. अण्णा हजारेजी यांची आज राळेगणसिद्धी येथे केंद्रीय मंत्री श्री कैलाश चौधरीजी यांच्यासमवेत भेट घेतली. केंद्र सरकारच्या विनंतीचा मान राखत त्यांनी आपले उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे.#AnnaHazare @KailashBaytu pic.twitter.com/0Lj8KPoM3T
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे”
लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की…; राम कदमांची टीका
रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा- सचिन सावांत
“राज ठाकरेंचा अयोध्येला जाण्याचा निर्णय योग्य, सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी सुद्धा जाणार”