पुणे : पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलो आणि अडकलोय, कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर, तर जनतेने सांगितलं तोपर्यंत. जनता म्हटली घरी बसा, की चाललो आम्ही. पण सीईओ बघा… जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर असतो. शिवाय प्रमोशन होत जातं. अभिनेता, कला, संगीत, पत्रकारिता अशी वेगवेगळी क्षेत्र निवडू शकता, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, असं क्षेत्र निवडा ज्यातून आनंद आणि पैसे मिळतील, याचा विचार करा. नाहीतर घरात गेला की भांडी आदळली नाही पाहिजे, ‘आला मेला’ असं नाही झालं पाहिजे, असं म्हणत अजित पवार यांनी एकच हशा पिकवला.
महत्वाच्या घडामोडी-
अखेर ठरलं! ‘या’ दिवसापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटण्याच्या मार्गावर
सेक्स कोणासोबत करणार हे 24 तास आधी पोलिसांना कळवा; ‘त्या’ न्यायालयाचा अजब निर्णय
“हा राजकीय दहशतवाद आहे, तो संपवावाच लागेल”