मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. कायद्याने काय व्हायचं ते होईलचं पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ठाकरे आहेत. हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असं कधी कुणाला म्हणत नाही.” असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
“भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहराम पाडा म्हटलं की मातोश्रीला त्रास होतो”
सीमाभाग महाराष्ट्राचाच! मुख्यमंत्र्यांनी दिला पुरावा
चावटपणा करणाऱ्याची चौकशीच नाही तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे; गुलाबराव पाटील कडाडले
“माझा होशिल ना फेम आदित्य ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात”