मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाकडून वाॅरंट आला आहे. वाशी टोलनाक्यावर झालेल्या तोडफोडप्रकरणी राज ठाकरे यांच्या नावे वाॅरंट आलं आहे.
नवी मुंबई येथे 2014 मध्ये राज ठाकरे यांचा जेंव्हा कार्यक्रम होता तेंव्हा त्यांनी भडकाऊ भाषण केलं होतं. आणि टोलनाक्यासंदर्भातलं भाषण करण्यात आल्यानंतर मनसेच्या माध्यमातनं वाशी टोलनाका हेतु 26 जानेवारी 2014 रोजी तोडफोड करण्यात आली होती. त्याप्रकरणी मनसेचे कार्यकर्ते यांच्यावरती वाशी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वारंवार राज ठाकरे यांना समंस धाडल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षरीत्या किंवा त्यांच्या वकीलांमार्फत कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून त्यांना वाॅरंट काढला आहे.
दरम्यान, 6 फेब्रुवारी रोजी त्यांनी बेलापूर कोर्टात हजर राहावं आणि जामीनासंदर्भातलं जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात यावी यासंदर्भात राज ठाकरे जर हजर राहिले नाहीत तर पुढील कारवाई करण्यासाठी कोर्ट विचार करेल किंवा पोलिसांनी याचा विचार करावा, अशा प्रकारचा हा वाॅरंट बेलापूर कोर्टाकडून काढण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
“तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर…”
मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं प्रत्युत्तर
“रक्षा खडसेंबद्दल वादग्रस्त उल्लेख! गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपने चूक सुधारली”