मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केल्यानंतर बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे, असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
केवळ राज्य प्रमुख या नात्याने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत वक्तव्य केलं असून, त्याला कोणताही आधार नाही. हा वाद अनेक वर्षाचा आहे. कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही. कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला आहे, असं अजित पवार म्हणाले.
बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर निवडून यायचे. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
महत्वाच्या घडामोडी-
“रक्षा खडसेंबद्दल वादग्रस्त उल्लेख! गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपने चूक सुधारली”
काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे- प्रकाश जावडेकर
“देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”
“…हे म्हणजे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं”