Home महाराष्ट्र “देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

“देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

मुंबई : दिल्लीमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीने संपुर्ण देशातील वातावरण तापलं आहे. तसेच यातून झालेल्या हिंसाचारावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

बळी गेले ते शेतकऱ्यांचे आणि रक्त सांडले ते पोलीस आणि जवानांचं… पण 60 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही? असा सवाल यावेळी सामनातून करण्यात आला.

दरम्यान, दिल्लीच्या रस्त्यावर जी दंडुकेशाही झाली त्याची जबाबदारी फक्त शेतकरी आंदोलकांवर टाकून चालणार नाही. जे सरकारला हवं होतं तेच घडवून आणण्यात आलं, असं म्हणत सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“…हे म्हणजे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं”

शेतकऱ्यांवर टीका करणं कंगणाला पडलं महागात!

“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”

“बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे; कर्नाटकच्या उपमुख्यमंंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा