मुंबई : मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं म्हणत कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यावरु भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबाद चे संभाजीनगर तर करा. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.
बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबाद चे संभाजीनगर तर करा.. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा. @OfficeofUT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 27, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”
“सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार असून आपण अंतिम पर्वाच्या दिशेने”
दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट- नवाब मलिक
आशिष शेलार हे भाजप व संघाचे गुलाम; अमोल मिटकरींचा टोला