Home महाराष्ट्र “सावरकर आणि गोडसेंबाबत अपशब्द वापरण्यात आले त्यावेळी संजय राऊतांची बोलती बंद...

“सावरकर आणि गोडसेंबाबत अपशब्द वापरण्यात आले त्यावेळी संजय राऊतांची बोलती बंद का होती?”

कोल्हापूर : भाजपने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं. सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला होता. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून सावरकर आणि गोडसेंबाबत अपशब्द वापरण्यात आले होते त्यावेळी संजय राऊतांची बोलती बंद का होती? त्यावेळी त्यांनी का ट्विट केलं नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक भाजपचं अधिकृत पुस्तक नाही. या पुस्तकाबद्दल तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते म्हणा, पण त्यावरून तुम्ही भाजपवर राग का काढता? अंसही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेना भवनात बाळासाहेबांना शिवाजी महाराजांच्या वरचे स्थान आहे का? निलेश राणेंचा राऊतांना सवाल

“…तर मी पुस्तक मागे घ्यायला तयार आहे”

‘हे’ पुस्तक थांबवण्यात यावं; शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी

“देशातील मावळा ‘हे’ कधीही सहन करणार नाही”