मुंबई : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा काल रात्री मुंबईत दाखल झाला आहे. ते आज राजभवनावर धडकणार आहेत. यावर मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर टी.व्ही 9 मराठीला त्यांनी मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते.
मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र राजभवनला जावं अशी त्यांची इच्छा आहे पण कोर्टाच्या आदेशानं दक्षिण मुंबईत मोर्च्याला परवानगी देता येत नाही, आम्ही त्यांना सर्व कायदेशीर बाबी सांगितल्या आहेत, असं विश्वास पाटील नांगरे म्हणाले.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वमीवर दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 800 पोलिस कर्मचारी-अधिकारी नेमण्यात आले आहेत. मोर्चाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, असा आमचा प्रयत्न असेल असंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे- उच्च न्यायालय
राडा आणि धिंगाणा होणारच कारण…; अतुल भातखळकरांची राष्ट्रवादीवर टीका
शेतकऱ्यांच्या या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही- देवेंद्र फडणवीस
“शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट”