मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भवऱ्यात अडकलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. याप्रकारानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. आणि रेणु शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.
हे प्रकरण धनंजय मुंडे-रेणू शर्मा पुरती मर्यादीत नसून यात योग्य कारवाई झाली नाही तर याचे दुरगामी परीणाम राज्यातील लेकीबाळींना भोगावे लागतील यासाठी तात्काळ कारवाई व्हावी, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
मुंबईपोलिस सहआयुक्त @vishwasnp यांची भेट घेतं खोटे आरोप करणार्या रेणू शर्मावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी केली
हे प्रकरण धनंजय मुंडे-रेणू शर्मा पुरती मर्यादीत नसून यात योग्य कारवाई झाली नाही तर याचे दुरगामी परीणाम राज्यातील लेकीबाळींना भोगावे लागतील
यासाठी तात्काळ कारवाई व्हावी pic.twitter.com/BRhLWkqy76— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 23, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये”
या देशाला भारत नाही हिंदूस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच आवश्यक आहे- संभाजी भिडे
“जयंत पाटील पात्रता नसताना राजकारणात आले आहेत”
“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”