सांगली : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर रेणू शर्माने बलात्काराचे आरोप केले होते. तेंव्हा भाजपने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती तसेच राज्यभर आंदोलन करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र रेणु शर्माने आपली तक्रार मागे घेतल्याने भाजप नेते पेचात पडले आहेत. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील वाळवा तालुक्यातील कुरळ येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजप आंदोलन करु शकताे. पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.
दरम्यान, महिलेने तक्रार मागे घेतली आहे. पण मुळात आपण आधीपासून सांगत होतो. थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे. पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे, पोलीस जो निष्कर्ष काढतील त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल, असंही जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
…पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे; निलेश राणेंचा अजित पवारांना टोला
अण्णा हजारे यांचं मन वळवण्यात देवेंद्र फडणवीसांना अपयश; अण्णा उपोषणावर ठाम
आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त का?; संजय राऊतांचा सवाल
साहेबांनी मोठे युद्ध जिंकलं; निलेश राणेंची धनंजय मुंडेंवर टीका