मुंबई : भाजपने ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं. सोशल मीडियावर या पुस्तकाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला जात आहे. यावर माजी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हे मान्य आहे का? असा सवाल शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?. शिवरायांचया वंशजांनो बोला.. काहीतरी बोला.., असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?
शिवरायांचया वंशजांनो बोला..
काहीतरी बोला.. pic.twitter.com/FVZEOIkn8v
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका सपष्ट करावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही.. एक सुर्य..एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज…छत्रपती शिवाजी महाराज…, असंही ते म्हणाले.
आज के शिवाजी नरेंद्र मोदी..
असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत?हेच ते जयभगवान गोल.यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांचया महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!! pic.twitter.com/LxWySzDX7s— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
दरम्यान, यावर उदयन राजे भोसले, शिवेंद्र राजे भोसले आणि संभाजी राजे काय बोलतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
जावई बापूंनी आता डोंबिवलीकडे लक्ष द्यावे; मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
आम्ही या सरकारला कायमची सत्ता दिलेली नसून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ- नारायण राणे
फडणवीसांना नागपूर जिंकता आलं नाही आणि ते बारामतीच्या जिंकण्याच्या गोष्टी करतात
चेहरा झाकून हल्ला करता आणि स्वत:ला मर्द समजता- सुनील शेट्टी