चंद्रपूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली. यावर शंका व्यक्त करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी धनंजय मुंडेवर टीका केली आहे.
खर तर राजीनामा यासाठीच घ्यावा लागतो की जो फिर्यादी असतो त्याच्यावर दबाव येता कामा नाही. जी भीती भाजपच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली, ती आता खरी ठरली. दबावातून आणि सत्तेचा वापर करुन केस मागे घेण्यात आली, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
केस मागे घेतल्या नंतरही खोटी फिर्याद असेल तर त्या तक्रारदारावर कारवाई झाली पाहिजे परंतू पोलिसांनी पुढे काय कारवाई केली?, असा सावाल सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, सेटिंग फिटिंग च्या राजकारणात एवढा गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही? अशी शंका सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केली.
सेटिंग फिटिंग च्या राजकारणात एवढा गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही? pic.twitter.com/XDPrfRFCvP
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) January 22, 2021
महत्वाच्या घडामोडी-
… म्हणून मी तक्रार मागे घेतेय; रेणु शर्मांचा मोठा खुलासा
सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे
कोणी कितीही दावे केले तरी…; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल