Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले

महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या  रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली. यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसं ढकलता येईल आणि आपण कसे क्लीन आहोत हे दाखवण्याचा जो प्रय़त्न आहे तो निंदनीय आहे,”असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंडेंच्या बाबतीत जी घटना घडली त्यामध्ये भाजपने सुरुवातीपासूनच तक्रार खरी की खोटी असल्याचं ठरवून मग निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी आपले संबंध असल्याचं तसंच त्यातून मुल असल्याचं आणि प्रतिज्ञापत्रात दोन्ही मुलं दाखवली नाहीत हेदेखील मान्य केलं. हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही राजीनामा मागितला होता. पण शिताफीने रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली म्हणजे ते निर्दोष आहेत, त्यांना क्लीन चीट द्या, बदनामी झाली असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अरे काय चाललंय काय? महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?, असा सवाल चंद्राकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

… म्हणून मी तक्रार मागे घेतेय; रेणु शर्मांचा मोठा खुलासा

सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे

कोणी कितीही दावे केले तरी…; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हेच का राष्ट्रवादीचे महिला धोरण?; तृप्ती देसाई यांचा सवाल