Home महाराष्ट्र सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे

सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे

पुणे : सीरम इन्स्टीट्यूटला लागलेल्या आगीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच हा घातपात होता की अपघात होता हे कळेल. त्याआधी काहीही भाष्य करणं घाई ठरेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन आगीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

कोरोनाच्या संकट काळात सीरम इन्स्टिट्यूट आशेचा किरण होती. त्यामुळे सीरमला आग लागल्याचं कळताच काळजाचा ठोका चुकला. मात्र, सुदैवाने जिथे लस तयार केली जाते तिथे हा प्रकार घडला नाही. कोरोना लसीचा साठा पूर्णपणे सुरक्षित आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सीरमच्या या नव्या इमारतीतील 2 मजले वापरात होते. तिथे नवीन केंद्र सुरू करण्यात येणार होतं. तिथेच ही दुर्घटना घडली. तसेच आगीमागे घातपात होता की अपघात होता, हे आताच सांगता येणार नाही. तसं बोलणंही योग्य ठरणार नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील मृत कुटुंबीयांची जबाबदारी सीरमने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदतीचा हात देईल, असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.


महत्वाच्या घडामोडी-

कोणी कितीही दावे केले तरी…; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हेच का राष्ट्रवादीचे महिला धोरण?; तृप्ती देसाई यांचा सवाल

धनंजय मुंडे प्रकरणवरुन संजय राऊतांचा भाजपला सल्ला; म्हणाले…

“आता स्टीव्ह स्मिथ नव्हे, तर ‘हा’ असेल राजस्थान राॅयल्सचा नवा कर्णधार”