पुणे : ग्रामपंचायतीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी भाजपा अनुसूचित जनजमाती मोर्चाला संबोधित करताना बोलत होते.
राज्यात 3 पक्षांचं सरकार आहे. तिन्ही पक्ष 3 दिशेने चालले आहेत. सरकारची अवस्था अत्यंत वाईट आहे. एकाच कोचवर तिघे बसण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या कोचवर आपण एकटे असून आपल्याला भरपूर जागा तयार होत आहे. त्यामुळे राजकीय स्पेस मिळत आहे. त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत आला असून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने 6000 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतीत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत 5500- 6000 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. तिघांनी मिळून देखील एवढ्या ग्रामपंचायतीत निवडून येऊ शकले नाहीत. आता खोटा आरोप करत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे, असं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
हेच का राष्ट्रवादीचे महिला धोरण?; तृप्ती देसाई यांचा सवाल
धनंजय मुंडे प्रकरणवरुन संजय राऊतांचा भाजपला सल्ला; म्हणाले…
“आता स्टीव्ह स्मिथ नव्हे, तर ‘हा’ असेल राजस्थान राॅयल्सचा नवा कर्णधार”